learn skill and earn 

DK


मागच्या काही दिवसांपासून बहिणीचे लग्न होते त्यामुळे व्यस्त होतो, मला प्रत्येक गोष्ट Observe करायची सवय आहे, लग्न म्हटले की लोक आले, कार्यक्रम आले त्यामुळे काम करणाऱ्या लोकांची गरज पण आली, मी मागील 1 महिन्यापासून प्रत्येक गोष्टीला बघत होतो, समजून घेतो आणि मला एक गोष्ट जाणवली ते मी आजच्या लेखात सांगणार आहे
#1
मागील 1 महिन्या पासून एक महिला आमच्या कडे भांडे घासण्यासाठी येत आहे, लग्न म्हटल्यावर लोक पण आले, दिवसाला 30 ते 40 लोक असायचे, नवीन लोक आले त्यांना चहा करणे, नाश्ता देने या मुळे भांडे हे जास्त वापरता आले आणि धुण्यासाठी त्या महिलेला देत होते, ती महिला दिवसातून 4 ते 5 वेळेस भांडे घासायची, दिवसभर काम करायची, मी घरच्यांना सहज विचारलं ही महिला एवढे काम करते तिला आपण किती पैसे देतो, त्यांनी उत्तर दिले 700 रुपये महिना म्हणजे 5 तास दररोज काम केले तर 150 तासाचे 700 रुपये म्हणजे एक तासाची किंमत 4 रुपये 66 पैसे.
#2.
लग्न म्हटल्यावर मंडप आले, घरा मागे 5 ते 6 मंडप टाकले, त्यांनी 2 दिवसाचे 25,000 घेतले, मंडप टाकणे आणि मंडप काढणे याला एकूण वेळ हा 2 ते 3 तास लागला असेल म्हणजे 3 तासात 25,000 रुपये, म्हणजे तासाला 8,500.
#3.
लग्न म्हटल्यावर नावरीचा मेकअप आला, माझ्या बहिणीने शहरातून एक मेकअप वाल्या महिलेला बोलावलं होतं, ती हळदीच्या दिवशी आली कार घेऊन ,1 तास मेकअप केला आणि नंतर लग्नाला आली, 1 तास मेकअप केला, म्हणजे तिने 2 तास काम केले आणि 15,000 रुपये घेऊन गेली, म्हणजे 7500 रुपये तास.
#4
मी प्रत्येक महिन्याला एक 7 दिवसाची लाइव्ह Batch करतो, ज्या मध्ये 70 ते 100 लोक जॉईन करतात, माझी फीस ही 5000 रुपये आहे आणि माझी लाइव्ह batch ही 7 दिवसामध्ये 10 तास शिकवतो, एप्रिल मध्ये 90 लोकांची batch केली, म्हणजे 4 लाख 50 हजार रुपये, 10 तासाच्या batch साठी म्हणजे 1 तासासाठी 45,000
अशे अनेक घटना घडल्या
सांगायचा मुद्दा, जी पहिला महिला सर्वात जास्त मेहनतीची काम करत होती पण तिला सर्वात कमी पैसे मिळत होते कारण भांडे घासणे ही महत्वाची स्किल नाही आहे
माझे एक आवडत वाक्य आहे
Amount of money you earn is propossional to difficulty of problem you solve
समाजाच्या दृष्टी कोनातून ज्या गोष्टीला महत्व आहे त्या गोष्टीचे तुम्हाला पैसे मिळतात
आयुष्यात तुम्ही जे काम करत त्याची value वाढवायची असेल तर BURNING PROBLEM सोडवा.
सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या नसलेल्या गोष्टी मध्ये तुम्ही कितीही मेहनत करा, पैसे जास्त मिळणार नाहीत
स्वतःची value वाढवायची असेल तर खालील गोष्टी करा
1. समस्या शोधा
2. महत्वाची स्किल शिका ज्याने ती समस्या सोडवू शकता
3. सराव करा
4. लोकांची तुमच्या स्किल ने समस्या सोडवा, पैसे जास्त मागा,लोक देतील
मी लोकांना सोशल मीडिया मार्केटिंग स्किल शिकवतो, माझ्या सारखे अनेक कोच काही तरी स्किल शिकवतात पण काही दीड शहाणे लोक आम्हांला चोर म्हणतात दुःख आम्हाला चोर म्हटले याचे नाही पण त्यांना त्यांचा फायदा दिसत नाही याचा आहे
21 वे शतक हे जो स्वतःला upgrade करेल त्यांचे आहे, जो स्वतःला Upgrade करेल तो चांगले आयुष्य जगेल आणि जो करणार नाही तो बाकीच्या लोकांना, जगाला शिव्या देत आयुष्य जगणार
तुम्ही ठरवा, तुम्हाला कसे जगायचे
वाघासारखे जगा
# स्किल वरती विश्वास ठेवणारा धनंजय

Dhananjay K
honest guy helping marathi speaking business owners