About Me

Home   >  About us

मी धनंजय कल्याणकर , एक सर्वसाधारण मराठी कुटुंबातून आलेला पुण्यातील एक सर्वसाधारण तरुण. लहानपणापासून आपल्या माणसासाठी काही करावे असं मला वाटायचे. अभियांत्रिकीची पदवी घेऊन कॉलेज बाहेर पडलो.पुण्यात काही ठिकाणी नोकरी केली. पण त्यात मन रमले नाही.त्यामुळे चक्क नोकरी सोडून डिजिटल मार्केटिंग प्रक्षिक्षण, मार्गदर्शन ,सेवांचा वेगळा मार्ग निवडला.

सुरवातीला मी ऑफलाईन क्लास रूम ट्रेनिंग घेत होतो, कोरोनामुळे ऑनलाईन ट्रेनिंग चा मार्ग स्वीकारला आणि आज महाराष्ट्रातील अनेक मराठी व्यासायिकांना त्यांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चे प्रक्षिशण,मार्गदर्शन आणि सेवेद्वारे मदत करतोय याचा मला अभिमान वाटतो.त्यांचा अनेकांना लाभ होत आहे. मी जे काही शिकवतो त्याचा वापर करून मराठी माणसं आपला व्यवसाय हजारातून लाखात , लाखातून करोडोत वाढवत आहेत.

हे सगळं सुरु करण्यापूर्वीच मी ठरवलं होत ,की मराठी माणसांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली तर माझा व्यवसाय आपोआप वाढेल, त्यामुळे पहिल्यापासून मी पैसे कमवण्यापेक्षा व्यावसायिकांना value कशी मिळेल याचा विचार केला आणि आज मी यशस्वी आहे .

माझे सर्वाना आवहान आहे की जग डिजिटल बनत चालले आहे, आमच्या सोबत जॉईन होऊन तुम्ही पण डिजिटल बना.